Est. 2002 | पुणे
गो विज्ञान संशोधन संस्था
गोसेवा, राष्ट्ररक्षा
वैज्ञानिक दृष्टीकोनातून पंचगव्य-आधारित जीवनशैली पुनर्स्थापित करून भारतीय गायींचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे
आमचा प्रभाव
परंपरेशी जोडलेले, विज्ञानाने प्रेरित
संस्थेची स्थापना
गो-विज्ञान संशोधन संस्थेची स्थापना श्रद्धेय मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने पुण्यात २००२ साली झाली. "पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट" म्हणून नोंदणीकृत.
आमचे ध्येय
भारतीय गाय-आधारित जीवनशैली पुनर्स्थापित करण्यासाठी समर्पित आहे, वैज्ञानिक दृष्टीकोनातून पंचगव्याच्या महत्त्वाला चालना देणे.
कार्यक्षेत्रे
शाश्वत निरामय समाज निर्मितीसाठी
वैज्ञानिक दृष्टा सिद्ध झालेल्या पंचगव्य वापराला प्रोत्साहन
गोविद्यान प्रकल्प
संस्थेने राबिलेले विविध महत्वाचे प्रकल्प - भारतीय गायींच्या संवर्धनासाठी आणि शाश्वत विकासासाठी
सध्या सुरू असलेले प्रकल्प
डिजिटल गाय आरोग्य निगरानी प्रणाली
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय गायींच्या आरोग्यावर रिअल-टाइम निगरानी ठेवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करणे. IoT सेंसर आणि मोबाइल ऍपचा वापर.
प्रभाव: रिअल-टाइम हेल्थ मॉनिटरिंग, लवकर आजार निदान आणि गायींच्या उत्पादनात वाढ
प्रगत पंचगव्य संशोधन आणि विकास
पंचगव्याच्या नवीन फॉर्म्युलेशन्स, संरक्षक आणि त्यांच्या आरोग्य फायद्यांवर वैज्ञानिक संशोधन. आधुनिक प्रयोगशाळा सुविधांचा वापर.
प्रभाव: नवीन उत्पादने, प्रभावी उपचार पद्धती आणि वैज्ञानिक प्रमाणीकरण
शाश्वत शेती प्रशिक्षण कार्यक्रम
शेतकऱ्यांना गो-आधारित शाश्वत शेती तंत्रे, जैविक खते आणि पर्यावरण अनुकूल पद्धती शिकवण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षण कार्यक्रम.
प्रभाव: 1000+ शेतकरी प्रशिक्षित, उत्पादनात 40% वाढ आणि पर्यावरण संरक्षण
पंचगव्य उत्पाद विकास
पंचगव्याच्या आधारावर आरोग्यदायी आणि पर्यावरण अनुकूल उत्पादने विकसित करणे, जसे की सौंदर्य प्रसाधने, आरोग्य पूरक आणि घरगुती वापराची उत्पादने.
प्रभाव: नवीन उत्पाद लाइन, रोजगार निर्मिती आणि शाश्वत जीवनशैली प्रोत्साहन
2024 च्या आधी राबवलेले प्रकल्प
भारतीय गायींच्या आधारावर शेती (CBOF)
देशी गायीच्या पंचगव्यावर व प्रामुख्याने गोमय-गोमुत्राचा उपयोग करून कमी खर्चात (80-90 टक्के बचत) चांगले उत्पन्न मिळवून देणारा शेती प्रयोग.
प्रभाव: अहिल्यानगर जिल्ह्यातील मांजरसुंभा, देवगाव, पाणोली, दैठणेगुंजाळ आणि फलटण जवळ नांदल परिसरातील 16 गावात 400 शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पंचगव्य चिकित्सा केंद्र
2006 पासून पुण्यात चालवलेला उपक्रम - कॅन्सर-कवरोग, मधुमेह, त्वचा व मूत्र विकार यावर यशस्वी उपचार.
एकूण रुग्णसंख्या: 500
वैद्य: सौ. ज्योती मुंदगी, श्री. ज्ञानेश्वर साठे
गणेशोत्सव निर्माल्य कंपोस्टिंग प्रकल्प
पुणे महानगरपालिका व वुमन्स इंडिया च्या सहाय्याने 2016 ते 2023 या कालावधीत 350 टन निर्माल्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मिती.
उद्दिष्ट: गरजू शेतकऱ्यांना सेंद्रिय खत पुरवठा
भारतीय गायींचे वितरण (गोदान)
अहिल्यानगर जिल्ह्यातील मांजरसुंभा व देवगाव येथे 87 ग्रामस्थांना भावड देशी गायी देण्यात आल्या.
परिणाम: गायी व घरातील वातावरणात चांगला बदल दिसू लागला
पंचगव्य उत्पादनांचे प्रशिक्षण व विक्री
2003 पासून विविध माध्यमातून विविध ठिकाणी चालविलेला उपक्रम. पुण्यात अनेक विक्री केंद्रे उभी राहिली.
उद्दिष्ट: पंचगव्य उत्पादनांचा व्यापक प्रसार
इतर महत्वाचे उपक्रम
पौर्णिमा कार्यक्रम: 2013 पासून भोसरी येथील पंजरापोळ-गोशाळेत मासिक कार्यक्रम
शाळा, घरासाठी किचन गार्डन प्रकल्प: स्वयंपूर्णतेसाठी
निर्माल्य ते अगरबत्ती प्रकल्प: महिला सक्षमीकरणासाठी
कै.श्री. मोरोपंत पिंगळे वार्षिक पुरस्कार
२०१० पासून देशी गाय व पंचगव्य उपयोजनावर संशोधन, गो आधारित सेंद्रिय शेती व पंचगव्य चिकित्सेवर दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कारित केले जाते.
२०२३ - बारामती
अध्यक्ष: श्री. केशवराव सर्जेराव जगताप
प्रमुख वक्ते: श्री. भैय्याजी जोशी
अतिथि: भा. ह. भ. प. बंडतात्या कराडकर महाराज
पुरस्कारार्थी
-
वैद्य श्री. चंदन मलजी घोटा, रतलाम
-
श्रीमती. नगीना मोहम्मद अन्वर खान, बारामुल्ला
-
श्री. प्रदीप दत्तात्रय मदने, फलटण
२०२२ - नगर
प्रमुख वक्ते: मा. नाना जाधव
प्रमुख अतिथी: मा. राधाकृष्ण विखेपाटील
पुरस्कारार्थी
-
सुयश चॅरिटेबल ट्रस्ट
-
डॉ. अजित रावळ
-
श्री. दिपक नरवडे
-
स्थानिक गोपालक
२०१९ - पुणे
प्रमुख वक्ते: प.पू. सरसंघचालक मा. मोहनजी भागवत
पुरस्कारार्थी
-
गोसेवा परिवार, कोलकाता
-
वैद्या ज्योती मुंदरगी
-
वैद्य अजित उदावंत
-
श्याम अगरवाल
२०१८ - रांजणगाव
प्रमुख वक्ते: मा. सुहासराव हिरेमठ
प्रमुख अतिथी: मा. कथुरिया, अध्यक्ष, कामधेनू आयोग
पुरस्कारार्थी
-
श्री. सुनिलजी मानसिंहखा
-
श्री. पद्माकर चिंचोळे
-
श्री. सुरेंद्र देव
-
सौ. व श्री. सोहन उदय हजारे
-
हांगे बंधु
-
सौ. रुपाली श्रीकांत चव्हाण
२०१५-२०१७
सोलापूर, भोसरी पांजरापोळ, कुडुव गाडी
उल्लेखनीय पुरस्कारार्थी
-
डॉ. देविंदर सडाना, करनाल, हरयाना
-
डॉ. महेंद्र दारोकर
-
गो विज्ञान अनुसंधान संस्था
-
दिव्य ज्योती जागृती संस्थान
-
मारुती फुले पांडुरंग गोशाळा
२०१०-२०१४ (प्रारंभिक वर्षे)
पुणे, कराड, नाशिक
संस्थापक पुरस्कारार्थी
-
जनभारती न्यास, कोल्हापूर
-
वैद्या नंदिनी भोजराज, नागपूर
-
माधव गो-विज्ञान अनुसंधान संस्थान, भीलवाडा
-
प्रा. रामस्वरूप चौहान, पंतनगर
-
अखिल भारतीय कृषी गो-सेवा संघ
पुरस्कार आकडेवारी
आमची टीम
अनुभवी विश्वस्त आणि कुशल कार्यकारी टीम - एकत्रित प्रयत्नांनी गोसेवा आणि संशोधनाचे कार्य
संस्थेचे विश्वस्त
संस्थेचे मार्गदर्शन आणि निर्णयक्षमता
कार्यकारी टीम
टास्क फोर्स टीम - 100 स्वयंसेवक
संशोधक टीम - 8 डॉक्टर + 10 विद्यार्थी
नेतृत्व: डॉ. प्रसाद खंडागळे